मुंबई

ताम्हाणी घाटात एस.टी.बस आणि कारचा भीषण

CD

ताम्हिणी घाटात
एसटी-कारची धडक
दोघांचा जागीच मृत्यू; तिघे जखमी
माणगाव, ता. ४ (बातमीदार) ः ताम्हिणी घाटात एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मानसकुमार साहू (वय ३८) आणि सखुबाई कानवडे (६५) अशी मृतांची नावे आहेत.
खेड आगाराची बस मंगळवारी दुपारी खेडहून चिंचवडकडे निघाली होती, तर कार पुण्यावरून महाडच्या दिशेने येत होती. ताम्हिणी घाटातील मौजे कोंडेथर गावानजीक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात कारमधील दोन प्रवासी मानसकुमार निरंजन साहू (रा. पौड) आणि सखुबाई तुकाराम कानवडे (रा. मुळशी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. रुपाली मानसकुमार साहू (२८), रमा मानसकुमार साहू (७) आणि ताराबाई बाळू नलावडे (४५) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT