सदानंद आयुर्वेद क्लिनिकमध्ये महिलादिन
ठाणे, ता. ४ : यशोधननगर भागात असलेल्या सदानंद आयुर्वेद क्लिनिकमध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ११ प्रतिष्ठित महिलांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना डॉ. अक्षता पंडित यांनी उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ठाण्यातील नेक्स स्टेपच्या सहसंस्थापक दर्शना सावंत, सीपीसीएच्या अध्यक्षा शकुंतला मुजुमदार, सारस्वत बँकेच्या व्यवस्थापक अनुजा पार्सेकर, आंतरराष्ट्रीय जलतरण चॅम्पियन आयुषी आखाडे, स्टारफिश अकादमीच्या संस्थापिका प्रवीणा आखाडे, कल्याण अग्निशमन दलाच्या धनश्री बागुल, श्रीनगर पोलिस ठाण्याच्या पीएसआय रेश्मा कदम, बरखा डायग्नोस्टीकच्या मालक डॉ. बरखा देशमुख, पूर्वा भालेकर, श्रद्धा कांदळकर आणि सारिका साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.