मुंबई

अखेर ‘त्या’ बिल्डरवर गुन्हा दाखल

CD

...अखेर ‘त्या’ बिल्डरवर गुन्हा दाखल
ग्राहकांना घराचा ताबा न दिल्याने कारवाई
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) ः बदलापूर येथील द चॅलेट एवेन्यू या इमारतीमध्ये घराची नोंदणी केलेल्या अनेक ग्राहकांची फसवणूक करून घराचा ताबा देण्यास नकार देणाऱ्या रितेश मिश्रा या विकसकाविरोधात अखेर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे द चॅलेट अवेन्यू या इमारतीचे बांधकाम कोरोनापूर्वी सुरू करण्यात आले. या इमारतीत एकूण १०७ सदनिका असून २०१६ मध्ये अनेकांनी घरासाठी नोंदणी केली होती. कल्याण येथील विकसक रितेश मिश्रा यांनी ही इमारत बांधताना ठरलेल्या रकमेनुसार आणि बाजारभावानुसार करारनामा करून ग्राहकांना सदनिका विकल्या; मात्र कोरोनामध्ये आलेली आर्थिक अडचण आणि भागीदारासोबत झालेल्या वादामुळे स्वतःचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी ग्राहकांना सध्याच्या बाजारभावाप्रमाणे वाढीव किंमत मागितली; परंतु ग्राहकांनी वाढीव किंमत देण्यास नकार दिल्याने त्यांना घराचा ताबा दिला नाही. अखेर दोन महिन्यांपूर्वी ग्राहकांनी विकसकाविरोधात इमारतीखालीच ठिय्या मांडला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी ग्राहक व विकसकात समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी मिश्रा यांना समज देत ग्राहकांना घराचा ताब्यात देण्यास सांगितले. या वेळी मिश्राने काही दिवसांची मुदत मागितली; मात्र महिनाभरानंतर मिश्राने न्यायालयातून सदनिकाधारकांना वाढीव किंमत देण्यासाठी नोटिसा बजावल्या. त्यामुळे ग्राहकांनी पुन्हा एकदा बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात मदतीसाठी दाद मागितली. पोलिसांनी कागदपत्रे तपासत आणि ग्राहकांचे म्हणणे ऐकत मिश्राविरोधात मोफाअंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराचा ताबा मिळेल, असा विश्वास पोलिसांनी ग्राहकांना दिला.
----
विकसक रितेश मिश्राविरोधात बदलापूरसह कल्याणमध्येही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बदलापूर पश्चिम पोलिसांनी लवकरात लवकर या विकसकाला ताब्यात घेऊन संबंधित ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा.
- अविनाश सोनावणे, समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT