मुंबई

फर्निचर मार्केटला भीषण आग

CD

फर्निचर मार्केटला भीषण आग
वारांगडे येथील सात दुकाने जळून खाक
बोईसर, ता. ४ (बातमीदार) ः बोईसर पूर्वेकडील वारांगडे-गुंदले गावाच्या हद्दीतील फर्निचरच्या दुकानांना मंगळवारी (ता. ४) सकाळी भीषण आग लागली. फर्निचरचे साहित्य आणि गोदामांमुळे आगीने अवघ्या काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती, की धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.
बोईसर-चिल्हार मार्गावरील वारांगडे येथील फर्निचर मार्केटला सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग विझवतानाही अडचणी येत होत्या. अखेर अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वतीने आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
----
...तर मोठा अनर्थ
फर्निचर मार्केटच्या बाजूलाच सेंट फ्रान्सिस शाळा आहे; परंतु आग वेळीच आटोक्यात आल्याने आग शाळेपर्यंत पोहोचली नाही. या शाळेच्या स्कूल बस या फर्निचर दुकानांच्या बाजूलाच उभ्या केल्या जातात. ही आग बसपर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

SCROLL FOR NEXT