अंबरनाथ, ता. ९ (वार्ताहर) : शहरात विकास आराखड्यानुसार प्रस्तावित एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे पालिकेने घाईघाईत काम सुरू केले. पण, या रस्त्यात बाधित होणारी घरे अद्याप हटवण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि असे झाले तर तीन कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा होणार आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून न्यू बॉम्बे हॉटेल, शगुन हॉटेलमार्गे जाणारा रस्ता विकास आराखड्यानुसार पुढे सरळ जाऊन मारुती मंदिराजवळ बी केबिन रोडला येऊन मिळतो. मात्र, स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पुढे या रस्त्यात जवळपास ३० घरे बाधित होत आहेत. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर असून, काही दिवसांपूर्वी त्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र, रस्ते कामात बाधित होणारी घरे अद्याप हटवण्यात आली नाहीत. हा रस्ता पुढे फेरीवाले, पार्किंगमुळे व्यापलेला असतो. आता जागा मोकळी न करता आहे तितक्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले, तर तीन कोटी रुपयांचा रस्ता फेरीवाले आणि पार्किंगसाठी आंदण दिल्यासारखेच होणार आहे. त्यामुळे बाधित घरांवर कारवाई कधी होते? आणि खरोखर डीपी प्लॅननुसार हा रस्ता तयार होतो का? हे पाहावे लागणार आहे.
विकास आराखडा प्लॅननुसार रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. त्यानुसारच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम होणार आहे.
- अभिषेक पराडकर, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.