मुंबई

बुद्धगया महाबोधी महाविहारसाठी कल्याणमध्ये मोर्चा

CD

बुद्धगया महाबोधी महाविहारसाठी कल्याणमध्ये मोर्चा
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या हाती सुपूर्द करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी बौद्ध भिक्षू संघाने केंद्र सरकारसह बिहार सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी बौद्ध संघाच्या वतीने कल्याणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. हे बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे सध्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन व सर्व समविचारी संघटनांमार्फत संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ८) कल्याणमध्ये मोर्चा काढण्यात आला.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून दुपारी निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयावर धडकला. या वेळी तहसीलदार कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार बुद्धगया टेम्पल ॲक्ट कलम १९४९ रद्द करावे आणि ब्राह्मणी पंडे पुरोहितांच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी, बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी. महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पाडले जावेत, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या वेळी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो, भंते प्रियरत्न थेरो, भंते शक्यरत्न थेरो, भंते तुशीतरत्न थेरो, भंते विनयरत्न, भंते इंद्ररत्न, भंते यामरत्न, भंते नंदरत्न, भंते शिलरत्न यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT