मुंबई

बहुरूपी पोलिसांमुळे नागरिकांचा गोंधळ

CD

बहुरूपी पोलिसांमुळे नागरिकांचा गोंधळ
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका भागवतात. यामध्ये प्रामुख्याने फौजदार, शंकर, हनुमान यांचे वेष धारण करून गावोगावी फिरून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. पोलिसांच्या वेषातील बहुरूपी पोलिसांमुळे कांदिवली पश्‍चिमेत एकच गोंधळ उडाला होता.
कांदिवली पश्चिमेला एकता नगर म्हाडा वसाहतीमध्ये हे बहुरूपी पोलिस पैसे मागत फिरत होते. बहुतांशी नागरिकांनी पैसे दिले, मात्र पोलिस नागरिकांकडे पैसे मागत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्थानिकांनी चारकोप पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. चारकोप पोलिसांनी चौकशी केली असता, आम्ही बहुरूपी आहोत, प्रवासी लोक कलावंत आहोत, असे सांगितले. पोलिसांनी त्यांना बहुरूपी आहात ते सांगा अन्यथा पोलिसांची वर्दी घालू नका, अशी सूचना देत सोडून दिले.
कांदिवली पश्चिम मेट्रो स्टेशनच्या बाजूच्या एकता नगर विभागात दुपारी चार पोलिस पैसे मागताना दिसून आले. खोटे पोलिस नागरिकांकडून पैसे लुटत असल्याची बातमी पसरली. शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी तातडीने पोलिस वेषातील त्या चार तरुण पोलिसांना पकडले. गर्दी जमल्याने ते तरुण घाबरले होते. काही वेळातच पोलिस उपनिरीक्षक विशाल तेजाळे यांनी पोलिस वेषातील चार तरुणांना पकडून पोलिस ठाण्यात नेले. चौकशी केली असता त्‍यांनी सांगितले की, होळीच्या काही दिवस अगोदरच आम्ही बहुरूपी वेगवेगळे पोशाख घालून, वेशभूषा करून नागरिकांकडे पैसे मागतो, त्यांचेही मनोरंजन होत असल्याने आनंदाने, स्वखुशीने पाच, दहा, वीस, पन्नास, तर काही शंभर रुपये देतात. त्‍यामुळे आम्हाला होळी सणानिमित्ताने चांगली कमाई होते. दोन दिवसांपासून आम्ही पोलिसांची वेशभूषा करून पैसे मागत आहोत.

पोलिसांची वर्दी घालू नका!
पोलिसांनी या प्रकाराची खोलवर चौकशी केली. बहुरूपी खेड्यात चालतात, मुंबईत बहुरूपी फारच कमी झाले आहेत. बहुरूपी म्हणून फिरत असाल, तर बहरूपी आहोत असे सांगा, पोलिसांची वर्दी घालू नका, पुन्हा कांदिवलीत फिरू नका, अशा सूचना देत चारही बहुरूपी पोलिसांना सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT