मुंबई

अंबरनाथमध्ये १११ जोडप्यांचा सामुदायिक शाही विवाह सोहळा

CD

अंबरनाथमध्ये १११ जोडप्यांचा सामुदायिक शाही विवाह सोहळा
अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : आकर्षक विद्युत रोषणाई, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी आणि संगीताच्या तालावर हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीमध्ये आनंदनगर एमआयडीसीमध्ये १११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्‍साहात पार पडला. सात वर्षांपासून अंबरनाथमध्ये सारा आधार फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष किशोर सोरखादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा या सोहळ्याचे आठवे वर्ष होते.
समाजातील अनेक घटकांना थाटामाटात लग्न करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, शिवाय लग्न सोहळ्यातील अवाजवी खर्च टाळण्याच्या दृष्टीने सामुदायिक विवाह सोहळा हा स्तुत्य उपक्रम ठरतो. त्‍यामुळे मागील आठ वर्षांपासून अंबरनाथमध्ये सारा आधार फाउंडेशनच्या वतीने गरीब, गरजू कुटुंबातील युवा-युवतींचा विवाह सोहळा सामुदायिकरित्या पार पाडला जात आहे. त्‍यानुसार नुकतेच शुक्रवारी ७ मार्च रोजी येथील आनंदनगर एमआयडीसीमध्ये सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. आनंदमय वातावरणात सर्व प्रकारचे उत्तम नियोजन तसेच अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या वेळी वधू-वर व त्यांचे आप्तेष्ट यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. या वेळी ठाणे जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, राष्ट्रवादी शहरध्यक्ष सदाशिव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नगरसेवक सचिन पाटील, शिवाजी गायकवाड, पद्माकर दीघे, उपशहरप्रमुख अरविंद मालुसरे, प्रकाश डावरे, मिलिंद गान, युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲड. निखिल वाळेकर, शिवसेना महिला शहर संघटक नीता परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, विविध पक्षातील पदाधिकारी, संस्थाचे सदस्य व नागरिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..........................
उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण
यंदाच्या वर्षी उद्योगरत्न पुरस्कार बेचर पटेल, आरोग्य मार्गदर्शक डॉ. अर्जुन शुशे आणि डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांना प्रदान करण्यात आले. तसेच हास्य जत्रा फेम कलाकारांची उपस्थिती या विवाह सोहळ्यात लक्षणीय होती. या वेळी मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे, धवलारीन बाय अवनी पाटील व पुणे येथील गोल्डन बॉइस आदींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT