मुंबई

डंपरच्या धडकेत सहा जण जखमी

CD

डंपरच्या धडकेत सहा जण जखमी
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) : पूर्व दृतगती महामार्गावर डंपरच्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. ९) रात्री एक वाजता मुंबई नाशिक वाहिनीवर मातीचा डंपर पुढच्या गाडीला धडकून हा अपघात झाला. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात चारचाकी वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून, वाहनात अडकलेल्या व्यक्तींना कटरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

मुंबई-नाशिक वाहिनीवर मुलुंडकडून येणारा मातीचा डंपर सुसाट वेगाने कशेळीकडे जात होता. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर समोरच्या आयशर टेम्पोला जाऊन धडकला. यामुळे टेम्पोने समोरच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. या वेळी चारचाकी वाहनात एकाच कुटुंबातील सहा प्रवासी बसले होते. ते सर्वजण गाडीमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांमध्ये अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढले. बाहेर काढताना कटरचा वापर करावा लागला.

कॅडबरी कंपनी येथील उड्डाणपुलाच्या उतरणीला हा अपघात झाला. अपघातात कारचालक राहुल जावळे, (वय ३६) स्वाती जावळे (३५) स्वरा जावळे (१२) शांभवी जावळे (१) प्रियंका बागुल (३८) शौर्य विजय बागुल (१६) हे जखमी झाले आहेत. कारमध्ये राहुल आणि स्वाती त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. अपघात होताच डंपरचालक पसार झाला. मातीने भरलेला हा डंपर मुलुंडकडून कशेळीच्या दिशेने चालला होता. या अपघातामुळे कॅडबरी पुलावरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे एक तास बंद होती. ती सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी अपघातग्रस्त तिन्ही वाहने रोडच्या बाजूला केली असून, ठाणे घोडबंदर वाहिनीवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT