मुंबई

पेणमधून हजारो गणपती कारखानदार मुंबईत धडकणार

CD

पेण, ता. ९ (वार्ताहर) : पीओपीच्या गणेशमूर्तींवर आलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील लाखो गणेशमूर्ती कारखानदारांवर तसेच त्यावर रोजगार करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याविरोधात राज्‍य सरकार गणेश कारखानदारांना न्याय मिळेल, या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री तथा भाजप रायगड जिल्हा संपर्क मंत्री आशीष शेलार यांनी दिली.
पेण तालुक्यातील हजारो गणेश कारखानदार आपल्‍या न्याय मागण्यांसाठी लवकरच मुंबई येथे धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी पेणमध्ये गणेशमूर्तिकारांची भेट घेत समस्‍या जाणून घेतल्‍या. पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर आहे, मात्र पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आल्‍याने लाखो कामगारांचे हाल होणार असून, अनेकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. गणेश कारखानदारांमध्ये नाराजीचे सावट पाहता, ही बंदी कायमस्वरूपी उठवावी यासंदर्भातील मूर्तिकारांच्या लढ्यात सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे आशीष शेलार यांनी सांगितले.

गणेशमूर्तिकारांच्या बाबतीत सरकार गंभीर आणि संवेदनशील आहे. या न्यायालयीन लढ्यात सरकार मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर बाबीत योग्य ती भूमिका मांडणार आहे. पीओपीच्या मूर्तींबाबत जे चालले आहे, त्यामध्ये सरकार मूर्तिकारांच्या सकारात्मक भूमिकेत आहेत. त्यामुळे सरकारशी त्यांची चर्चा सुरू आहे. योग्य निर्णय लवकरच होईल.
आशीष शेलार, संपर्क मंत्री रायगड

राज्यातील लाखोंच्या संख्येने गणेशमूर्तिकार तसेच कारागीर येत्या ११ तारखेला मुंबई येथे मूर्तिकारांचा मेळाव्यासाठी येत असून, ही लढाई पीओपीच्या बाबतीत आहेत. त्यामुळे सरकारला आमचे म्हणणे आहे की याबाबतची बंदी उठवून मूर्तिकारांबाबत योग्य निर्णय द्यावा.
अभय म्हात्रे - अध्यक्ष गणपती मूर्तिकार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT