मुंबई

गांजाची तस्करी करणारी महिला अटक

CD

गांजाची तस्करी करणारी महिला अटकेत
चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपर परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा म्हात्रे (५५) असे आरोपी महिलेचे नाव आहे. शहरात अमली पदार्थांची तस्करी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी मुंबई शहर व उपनगरांत रात्रीची गस्त सुरू केली आहे. घाटकोपर असल्फा व्हिलेज परिसरात गुरुवारी (ता. ६) रात्री गस्‍त घालत असताना कलावती चाळ परिसरात एक महिला पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी पोलिसांनी महिला पोलिसांना पाचारण केले. तिची झडती घेतली असता, तिच्याजवळ पोलिसांना १० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला आहे. आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Best Jobs 2026 : कोटींचा पगार, मोफत घर-जेवण अन् 1 वर्षात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड मिळणार! 'ही' कंपनी देत आहे अनोखी नोकरी

लग्नानंतर त्याचं ते सत्य समजलं... शुभांगी अत्रेचा मृत पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, 'आम्हाला वाटलेलं की तो...

Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT