मुंबई

बचत गटाच्या महिलांचा सन्मान

CD

बोईसर, ता. ९ (बातमीदार) : बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उमरोळी येथील विसावा बचत गटाच्या महिलांचा महिलादिनी सत्कार करून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. पालघर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उमरोळी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या पाच दिवसांच्या चौथ्या बॅचचा समारोप शनिवारी (ता. ८) झाला. या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १६५ शिक्षक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणाच्या समारोपानंतर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी उमरोळी येथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या विसावा बचत गटाच्या कविता राऊत आणि अक्षता पाटील यांचा प्रशिक्षणाचे सुलभक आणि समन्वयक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार

Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

SCROLL FOR NEXT