मुंबई

अदाणीच्या उत्थानचा तिसरा वार्षिक उत्सव

CD

अदाणीच्या उत्थानचा तिसरा वार्षिक उत्सव
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
मुंबई, ता. ९ : मुंबईच्या महापालिका शाळांमधील पंचवीस हजार गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मोठा फरक घडविणाऱ्या अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन यांच्या उत्थान या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून तिसरा वार्षिक उत्थान उत्सव नुकताच मुंबईत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उत्थान उपक्रमाची माहिती देणारे कॉफीटेबल बुक प्रसिद्ध करण्यात आले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी, उपायुक्त (शिक्षण) डॉक्टर प्राची जांभेकर, अदाणी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक वसंत गढवी, तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ व्यवस्थापक हजर होते. या वेळी महापालिकेचे शिक्षण अधिकारी, तसेच अदाणी फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक हजर होते.
उत्थान उत्सव कार्यक्रमात विविध आंतरशालेय सांस्कृतिक, निबंध लेखन, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा तर पालकांसाठी पौष्टिक टिफिन तयार करणे, गायन, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून गरज असलेल्यांना चष्मेही देण्यात आले. या उपक्रमात शिक्षकांसाठी विशेष सत्रे असतात, तसेच पालकांना शाळेत बोलावून किंवा घरी जाऊनही माहिती दिली जाते.

८२ शाळांची निवड
उत्थान प्रकल्प सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाला. त्यानंतर या प्रकल्पात महापालिकेच्या ८२ गरजू शाळा काटेकोर तपासणीअंती निवडण्यात आल्या. प्रकल्पाचा फायदा पंचवीस हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. नुकतीच अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने महापालिकेच्या सहकार्याने शिष्यवृत्तीच्या तयारीसाठीची वीस हजार पुस्तके साडेपाच हजार विद्यार्थ्यांना दिली. तसेच ८२ शाळांमध्ये बारा हजार लायब्ररीची पुस्तकेही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT