महिला उद्योजिका घडविण्यासाठी ‘नूवामा’चा पुढाकार
जागतिक महिलादिनी वुई बाजारचे आयोजन
प्रभादेवी, ता. ९ (बातमीदार) : महिलांना आपला व्यवसाय वाढवून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्यातून महिला उद्योजक घडण्यासाठी नूवामा वेल्थने पुढाकार घेतला असून निवडक महिला उद्योजकांना महिलादिनी वुई बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्ताने नुवामा वेल्थने अंधेरी येथील कनकिया वॉल स्ट्रीट येथे आपल्या विशेष ब्लू बिंदी उपक्रमाअंतर्गत महिला उद्योजक वुई बाजारचे आयोजन केले होते.
महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरतेवर भर देणाऱ्या नूवामाच्या बिंदी या या उपक्रमातून ऑफलाइन आणि डिजिटल उपक्रमांद्वारे देशभरातील महिलांचा एक समुदाय तयार झाला असून आपल्या संवादात्मक उपक्रम तसेच सोशल मीडियावरील साहित्याद्वारे दहा लाख महिलांपर्यंत तो पोहोचला आहे.
वुई बाजारच्या पहिल्या आवृत्तीत ११ अद्वितीय महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. त्यांची निवड त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि विशेष उत्पादनांच्या आधारे १०० प्रवेशिकांमधून करण्यात आली. हे उद्योग हस्तकला, दागिने तसेच चविष्ट पदार्थांपासून ते खास जीवनशैली उत्पादनांपर्यंत विविध प्रकारचे होते. त्यातून त्यांची महत्त्वाकांक्षा, नावीन्यपूर्णता, कलात्मकता आणि वैयक्तिक प्रवास दिसून आला.
ब्लू बिंदीच्या माध्यमातून नुवामाने आर्थिक ज्ञान व साधनांसह १,००० पेक्षा अधिक महिलांचे सक्षमीकरण केले असून भारतभरातील महिलांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.