ऐरोलीत हॉटेलमध्ये जेवताना
महिलांच्या प्लेटमध्ये उंदीर
महिलादिनी झालेल्या किळसवाण्या प्रकाराबाबत संताप
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिलादिनानिमित्त ऐरोलीतील एका नामांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्लेटमध्ये चक्क उंदराचे पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. या किळसवाण्या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुन्हा नोंदवण्यासाठीही रात्री उशिरापर्यंत रबाळे पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवल्याबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सर्व प्रक्रिया पूर्ण करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, असे रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.
महिलादिनाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ऐरोली येथील नामांकित हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आले होते. त्यानुसार गणराज सोसायटीतील दहा महिला सायंकाळी आठच्या सुमारास या हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी जेवणाची ऑर्डर केली असता जेवणाच्या प्लेटमध्ये चक्क उंदराचे पिलू वाढण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांसह इतरांनी हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले. या महिलांनी त्वरित या प्लेटचे छायाचित्र काढले; मात्र त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने ही प्लेट घाईगडबडीत कचऱ्याच्या डब्यात टाकली. महिलांनी तत्काळ पोलिसांना बोलावून हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे वारंवार येत होते, असेही या महिलांनी सांगितले.
----
पाच तासांनंतर घेतली तक्रार
हॉटेलमध्ये हा प्रकार सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडला. पोलिसांना बोलावताच त्यांनी तपासणी केली; मात्र पोलिसांनी वेगवेगळी कारणे देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करून शनिवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत जवळपास पाच तास ताटकळत ठेवले. त्यामुळे घरी निघून गेल्यानंतर मध्यरात्रीनंतर दोन वाजता पुन्हा बोलावण्यात आले. अखेर पहाटे तीन वाजता गुन्हा नोंदवण्यात आल्याचे या महिलांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.