मुंबई

कुर्ला रेल्‍वे स्‍थानकात कचरा

CD

कुर्ला रेल्‍वे स्‍थानकात कचरा
रेल्‍वे प्रशासन, पालिकेचे दुर्लक्ष
चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळील तिकीट खिडकीसमोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. पालिका व रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्‍याने प्रवाशांना नाक मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय.
मध्य व हार्बर मार्गावरील कुर्ला हे महत्त्वाचे स्‍थानक म्‍हणून ओळखले जाते. त्‍यामुळे या स्‍थानकात नेहमीच प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.
कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक तिकीट खिडकीलगतच्या मार्गावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचा ढीग साचला जात आहे. या परिसरातील व्यापारी व रहिवाशांकडूनही कचरा फेकला जात असल्‍याने कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढत आहे.

दु्र्गंधीचा सामना
तिकीट काढण्यास येणारे प्रवासी व नागरिकांना हा कचरा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पालिका व रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा कचरा लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT