वाशी, ता. १० (बातमीदार) : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने डॉ. डी. वाय. पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या माध्यमातून महिला मिनी मॅरेथॉन पार पडली. या स्पर्धेत दोन हजार २०० हून अधिक विविध वयोगटांतील महिला सहभागी होत धावल्या.
‘चला धावूया स्वच्छ नवी मुंबईसाठी’ हा संदेश प्रसारित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून डॉ. डी. वाय. पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या वतीने कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या संकल्पनेतून, उपाध्यक्ष डॉ. शिवानी पाटील व डी. वाय. पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबच्या प्रमुख राजलक्ष्मी पाटील यांच्या वतीने या मिनी महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची या उपक्रमास मान्यता मिळाली व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमास महापालिकेने सहकार्य केले.
-----------------
दामिनी पेडणेकर विजेत्या
सायन-पनवेल महामार्गानजीकच्या सेवा रस्त्यावर असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या महिला मिनी मॅरेथॉनला प्रारंभ झाला. महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या महिला मॅरेथॉनला प्रारंभ झाला. या स्पर्धेत दामिनी पेडणेकर यांनी विजेतेपद पटकावले; तर द्वितीय क्रमांक प्रतिमा नसरत्ना व तृतीय क्रमांक सुजाता माने यांनी पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.