मुंबई

शिंदेंच्या शिवसेनेकडून पाचव्या जिल्‍हाप्रमुखपदाची निवड

CD

शिंदेंच्या शिवसेनेकडून पाचव्या जिल्‍हाप्रमुखपदाची निवड
रायगडमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्याचे पाऊल; नाराजी पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
कर्जत, ता. १० (बातमीदार) ः शिवसेना शिंदे गटाकडून रायगड जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच उरण मतदारसंघासाठी अतुल भगत यांची पाचव्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे, मात्र या निर्णयामुळे संतोष भोईर नाराज झाले असून, त्यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाने रायगडमध्ये चार जिल्हाप्रमुख नेमले होते. महाड व श्रीवर्धनसाठी प्रमोद घोसाळकर, पेण-अलिबागसाठी राजा कोणी, पनवेल महानगरसाठी रामदास शेवाळे आणि उरण-कर्जतसाठी संतोष भोईर हे या जबाबदाऱ्या सांभाळत होते, मात्र मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीवरून उरणसाठी अतुल भगत यांची नियुक्ती झाल्याने संतोष भोईर यांचे अधिकार संकुचित झाले. त्यामुळे नाराज झालेल्या भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला. उरण मतदारसंघात मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या अतुल भगत यांना कमी अनुभव असून, अलीकडील विधानसभेत त्यांनी युतीसाठी कार्य न करता अपक्ष उमेदवार म्हात्रे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपच्या तालुका अध्यक्षांनी त्यांच्याविरोधात अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला होता. तरीही भगत यांना जिल्हाप्रमुखपद मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी पसरली असल्याचे भोईर समर्थकांचे म्हणणे आहे. दरम्यान, भोईर समर्थकांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या योगदानाची योग्य दखल घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्यांना एखाद्या महामंडळावर जबाबदारी देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. आता पक्षाचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
######################
संतोष भोईर मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांचे बंधू वसंत भोईर यांनी १९९९ मध्ये काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवल्याने त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. संतोष भोईर यांनी २००४ मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली, मात्र अपयश आले. २००९ मध्ये आपल्या बंधुसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी पक्षसंघटनेत काम केले, मात्र २०२३ च्या पंचायत समिती निवडणुकीत मनोहर थोरवे यांच्याकडून पराभव झाला. पक्षाच्या नेत्यांवर पराभवाचा ठपका ठेवत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते शिवसेनेत सक्रिय झाले. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी अथक परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT