मुंबई

मुरबाड-कल्याण

CD

मुरबाडकरांचा प्रवास सुखाचा
कल्याणसाठी १९ फेऱ्यांची वाढ, प्रवाशांना दिलासा
मुरबाड, ता. १० (वार्ताहर)ः मुरबाडवरून कल्याणसाठी असलेल्या बस सेवेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे या मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्याची मागणी राज्य परिवहनच्या ठाणे विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार तब्बल १९ जादा फेऱ्यांना मान्यता देण्यात आली असून आगारासाठी नवीन बस दिल्या जाणार आहेत.
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागांतून कल्याण, मुंबई आणि इतर शहरांमध्ये दररोज हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गावरील राज्य परिवहनच्या बससेवा प्रवाशांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. पूर्वी मुरबाडवरून कल्याणला जाण्यासाठी प्रवासी जीपचा पर्याय होता. पण शासनाने मुदत संपलेल्या वाहने बंद केल्याने विद्यार्थी तसेच चाकरमान्यांना एसटीवरच अवलंबून राहावे लागते. दररोजच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णकांत मलिक यांनी राज्य परिवहन ठाणे विभागाचे नियंत्रक पळसुले तसेच मुरबाड आगार प्रमुखांसोबत यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. तसेच प्रवाशांच्या अडचणी मांडताना कल्याण-मुरबाड मार्गावर जादा फेऱ्या सुरू करण्याची तसेच मुरबाड आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती.
़़़़़़़--------------------------------------------------------------
सात फेऱ्यांच्या मार्गात बदल
राज्य परिवहनच्या ठाणे विभागाने कल्याण-मुरबाड मार्गावर पूर्वीच्या २० फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ केली आहे. तसेच कल्याण-मुरबाड-पनवेल मार्गावरील सात फेऱ्यांच्या मार्गात बदल करून मुरबाडमार्गे सुरू केल्याने १९ फेऱ्यांची वाढ झाली आहे. तसेच मुरबाड आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी, कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
--------------------------------------------------------------
अपुऱ्या फेऱ्यांमुळे मनस्ताप
अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत होते. तसेच गर्दीमुळे कल्याणपर्यंतचा प्रवास उभ्यानेच प्रवास करावा लागत होता. पण आता वाढलेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून आरामदायी प्रवासही करता येणार आहे
--------------------------------------
प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले त्याचा आनंद आहे. राज्य परिवहन ठाणे विभागाने प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेतला. या निर्णयामुळे विद्यार्थी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
- कृष्णकांत मलिक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, ठाणे जिल्हाध्यक्ष
------------------------------------
मुरबाड कल्याण महामार्गावर यापूर्वी वीस बस धावत होत्या. आता नव्याने १९ बसची वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याण मुरबाड महामार्गावर ३९ बस धावत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- योगेश मुसळे, बस आगार प्रमुख, मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT