मुंबई

बंद कंपनीतील यंत्रसामग्री हलवण्याचा डाव

CD

कामगारांचे वेतन थकीत; ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा

रोहा, ता. १० (बातमीदार) ः अनेक वर्षांपूर्वी धाटाव एमआयडीसीतील कॅलकेम कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडल्यामुळे कामगारांना दोन महिन्यांचा पगार तसेच रजेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून कंपनी व्यवस्‍थापनाकडून ग्रामपंचायत कर आणि सरकारी कर थकीत आहे. दिवाळखोरीत निघालेला कारखाना साधना कंपनी व्यवस्थापनाने विकत घेण्याचे ठरवले असून, कंपनीतील मशिनरी भंगारात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
याबाबत कुणकुण लागताच कामगारांनी न्याय मिळवण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हक्कांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. जर कारखाना हलवला, तर कॅलकेम कंपनीतील कामगारांची थकीत देणी कोण देणार, असा प्रश्‍न उपस्थित करून जोपर्यंत कामगारांचा पगार आणि ग्रामपंचायतीची थकीत रक्कम अदा केली जात नाही, तोपर्यंत कंपनीतील साहित्य हलवू देणार नाही, असा इशारा शेडगे यांनी साधना नायट्रोकेम कंपनी प्रशासनाला दिला आहे.
धाटाव एमआयडीसी येथील कॅलकेम कंपनी काही वर्षांपूर्वी बंद पडली. त्यामुळे कंपनीतील कामगारांचे नुकसान झाले. कंपनीवर अवलंबून शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. राजकीय नेत्यांनीही दुर्लक्ष केल्‍याची कामगारांचे म्‍हणणे आहे. यापूर्वीही पेप्सी कंपनी बंद पडली त्या वेळी कामगारांना वाऱ्यावर सोडत पोलिस बंदोबस्तामध्ये कारखान्यातील सामग्री हलवण्यात आली.

ठाकरे गट कामगारांच्या पाठीशी असून, लवकरच रोहा पोलिसांना निवेदन देणार असल्‍याचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी सांगितले. बंद असलेल्या कॅलकेम कंपनीतून किमती साहित्य व मशीन इतर ठिकाणी घेऊन जात असल्याची माहिती समजताच रविवारी (ता. ९) तालुकाप्रमुख समीर शेडगे, धाटाव विभागप्रमुख नितीन वारंगे, नीलेश वारंगे आदींनी कंपनी गेटवर धडक देत साधना कंपनी प्रशासनाला इशारा दिला.

रोहा : बंद पडलेल्या कॅलकेम कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT