मुंबई

खोपट्यामध्ये रंगला लाल मातीतील कबड्डीचा थरार

CD

खोपट्यामध्ये रंगला लाल मातीतील कबड्डीचा थरार
प्रथम क्रमांकाचे मानकरी पांडवदेवी रामवाडी पेण
उरण, ता. १२ (वार्ताहर) ः सध्या सर्वत्र क्रिकेटची धूम सुरू असतानाच खोपट्याच्‍या मैदानात जिल्हास्तरीय लाल मातीतील कबड्डी स्पर्धेचा थरार रंगला होता. मनसेच्या १९व्या वर्धापनदिन व जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आर्थिक दुर्बल असणाऱ्या शालेय मुलींच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याबरोबरच कबड्डीसारख्या मैदानी खेळाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणचे अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत आणि सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्था उरण यांनी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखात केले होते.
या कबड्डी स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष करून तरुणाईने गर्दी केली होती. या वेळी कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थिनींचा विशेष सन्मान स्पर्धेचे आयोजक ॲड. सत्यवान भगत यांच्या माध्यमातून करण्यात आला. या कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांकाचे मानकरी पांडव देवी रामवाडी पेण, द्वितीय क्रमांक गणेश क्लब उरण, तृतीय क्रमांक मिडलाइन कर्जत तर चतुर्थ क्रमांक गणेश दिवलांक व सर्वोत्कष्ट चढाई गणेश क्लब उरण मयूर कदम, पब्लिक हीरो गणेश ठाकूर, सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत जाधव पांडवादेवी संघातील खेळाडू यांना पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उद्योजक राजा खारपाटील, मनसेचे नेते संदीप दळवी, सरचिटणीस शेखर जाधव, उपाध्यक्ष अमोल तांबे, रायगड जिल्हा सदस्य विनोद म्हात्रे, उद्योजक योगेश पाटीलसह इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT