पाणी समस्या सोडविण्यासाठी राज ठाकरेंना पत्र
खारघर, ता. १० (बातमीदार): खारघरमधील स्पॅगेटी सोसायटीमधील रहिवाशांना गेल्या २२ वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. या समस्येकडे लक्ष केंद्रित करून न्याय मिळावा, यासाठी स्पॅगेटीमधील प्रियदर्शनी सोसायटीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे समस्या मांडली आहे.
सिडकोने खारघर सेक्टर १५ मध्ये स्पॅगेटी गृह संकुलांची उभारणी करून २००३ रोजी लाभार्थींना सदनिकेचा ताबा दिला. स्पॅगेटीमधील प्रियदर्शनी गृहनिर्माण सोसायटीत ३३६ सदनिका आहेत. सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सिडकोने पुरेसा पाणीपुरवठा करून पाणी समस्या दूर करावी, यामुळे सोसायटीने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, मात्र तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदनिकाधारकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे संकुलामधील सदस्यांमध्ये संघर्ष, वाद विवाद, भांडणे होत असल्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियमानुसार दर दिवशी प्रत्येक व्यक्तीला १३५ पाणी आवश्यक आहे, मात्र सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेक वेळा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नुकतेच रहिवाशांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून पाण्याबाबत समस्या मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.