बदलापुरात उष्णतेची लाट
तापमान ४२° सेल्सिअसवर
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून सरासरी तापमानात वाढ झाली आहे. त्यातच आता मार्च महिना सुरू होताच उष्णतेची लाट बदलापुरात आली आहे. सोमवारी (ता. १०) बदलापुरात कमाल तापमानात वाढ झाल्याने पारा ४२° डिग्री सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडण्याचे टाळा, शरीराची पाण्याची पातळी वाढवा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.
होळीपूर्वीच उष्णतेची लाट आल्याने होरपळून टाकणाऱ्या उन्हाने बदलापूरकर हैराण झाले होते. रिक्षाचालक, डिलिव्हरी करणारे दुचाकीस्वार व उन्हात उघड्यावर काम करणाऱ्या अनेकांना उन्हाच्या तीव्रतेचा सर्वाधिक त्रास झाला आहे. बदलापूर शहराचे कमाल तापमान हे ४२° डिग्री सेल्सिअसवर गेल्याने यंदाच्या मोसमातील आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आठवड्याच्या या पुढील दिवसांतसुद्धा असेच वातावरण राहणार आहे. तसेच कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याचे अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली आहे. बदलापूरसहित संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे या लाटेपासून बचावासाठी शक्यतो दुपारी १२ ते तीनपर्यंत थेट उन्हात संपर्क होणार नाही, अशी काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी व ग्लुकोजवाढीसाठी नारळ पाणी, फळांचा तसेच उसाचा रस यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनात वाढ करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
पहाटे थंडी
उष्णतेची लाट आली असली तरी रात्री अजूनही २०° सेल्सिअसच्या आतच तापमान असल्याने सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत अजूनही थंडीचा अनुभव येत आहे; मात्र सकाळी थंडी, दुपारी उष्णता आणि सायंकाळी सामान्य तापमानामुळे मानवी शरीरावर याचे परिणाम होत आहेत. आजारपणसुद्धा वाढत आहे. यात सर्दी, ताप, डिहायड्रेशनसारखे रुग्ण जास्त आढळत आहेत.
त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी उन्हाशी थेट संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.