नैसर्गिक रंगांची उधळण करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : होलिकोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रंगांची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत; मात्र बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची भीती असते. अशा रंगामुळे डोळ्यांना इजा, त्वचाविकार अथवा शरीरात गेल्यावर धोकादायक ठरते. त्यामुळे नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.
होळीची सण दोनज दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गल्लीबोळात उत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे. बच्चेकंपनी आतापासूनच धमाल करताना दिसून येत आहे; मात्र ही धमाल अंगाशी येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अंगावर पाणी उडवून रंग लावण्याचे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळत असले, तरी या रंगात रासायनिक रंग अपायकारक ठरतो. कृत्रिम किंवा अजैविक रंग हे ॲल्युमिनियम, पारा, मोरचूद, जस्त, ॲसबेसटॉस, कथिल, क्रोमियम, कॅडमियम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात. रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्यावर त्वचेला जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, खाज येणे असा त्रास होऊ शकतो. यासोबतच रंगाची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडेही उठू शकतात. डोळ्यांना जळजळ होऊन रंगामुळे गंभीर इजा होण्याचा धोका असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.