मुंबई

हृदयाच्या छिद्रावर पहिली हायब्रिड शस्त्रक्रिया

CD

हृदयाच्या छिद्रावर पहिली हायब्रिड शस्त्रक्रिया
एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये ११ महिन्यांचे बाळ गंभीर आजाराने त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : गेल्या अनेक दिवसांपासून ११ महिन्यांचा इम्तियाज सलीम पटेल गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याला वाढण्यात अडथळे येत होते, दूध पिण्यास त्रास होत होता आणि वजनही वाढत नव्हते. सोलापूरमध्ये प्राथमिक उपचार घेण्यात आले, मात्र त्याची प्रकृती बिघडली. अखेर त्याला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचे वजन केवळ ३.५ किलो होते. तपासणीत त्याच्या हृदयात मोठे छिद्र असल्याचे मिड-मस्क्युलर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट निदान झाले. त्या वेळी हृदयाच्या कप्प्यांमधील रक्त मिसळत असल्याचे स्पष्ट झाले.

इम्तियाजची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तातडीने उपचार करणे आवश्यक असल्याने हृदयतज्ज्ञ डॉ. पराग बलगट यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीमने पश्चिम भारतातील पहिली हायब्रिड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. पारंपरिक शस्त्रक्रियेत हृदय थांबवून रुग्णाला हार्ट-लंग मशीनवर ठेवले जाते, मात्र या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत धडधडणाऱ्या हृदयावरच शस्त्रक्रिया करण्यात आली. एका कॅथेटरच्या मदतीने १२ मिमी मस्क्युलर ऑक्लुडर डिव्हाइस हृदयातील छिद्र बंद करण्यासाठी बसवण्यात आला.
----------------------------------
प्रकृतीत लक्षणीय सुधारणा
या अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या मदतीने इम्तियाजचे लवकर पुनर्वसन शक्य झाले. अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधी म्हणजेच केवळ सहा दिवसांतच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. फक्त एका आठवड्यात त्याचे वजन १.१ किलोने वाढले.
--------------------------------
रिकव्हरी कालावधी कमी
फॉलो अप इकोकार्डिओग्रॅममध्ये हृदयातील छिद्र संपूर्णपणे बंद झाल्याची पुष्टी झाली, फक्त अत्यल्प प्रमाणात रक्त प्रवाह दिसून आला. ही यशस्वी शस्त्रक्रिया जन्मजात हृदयरोग उपचारातील एक महत्त्वपूर्ण प्रगती ठरली आहे. हायब्रीड पद्धतीमुळे रुग्णांचा रिकव्हरी कालावधी कमी होतो.

व्हीएसडी म्हणजे काय?
व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा जन्मजात हृदयरोग आहे, ज्यामध्ये हृदयाच्या खालच्या कप्प्यांमध्ये छिद्र असते. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त आणि ऑक्सिजनविरहित रक्त मिसळते. सामान्यतः व्हीएसडी बंद करण्यासाठी हृदय थांबवून रुग्णाला हार्ट-लंग मशीनवर ठेवले जाते आणि छिद्रावर टाके लावले जातात. मात्र या प्रकरणात एक आधुनिक आणि नावीन्यपूर्ण पद्धत वापरण्यात आली, जिथे धडधडणाऱ्या हृदयावरच शस्त्रक्रिया करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT