मुंबई

घरगुती वादातून महिलेचा खून

CD

घरगुती वादातून महिलेचा खून
कासा पोलिसंकडून गुन्हा दाखल

कासा, ता. १० (बातमीदार) ः थेरोंडा धापशीपाडा येथे एका महिलेचा तिच्याच नवऱ्याने घरगुती वादातून गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाब सुरेश भोईर (वय ५२) हिला ९ मार्चला सायंकाळी तिचा नवरा सुरेश रामा भोईर (वय ५८) याने घरगुती कारणावरून वाद घालून मारहाण केली. फिर्यादी रामदास सुरेश भोईर (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडित महिलेला घरातून बाहेर जाण्याचे कारण विचारले आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेला थप्पड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच हातात दगड घेऊन डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर जबर मार दिला. त्यामुळे तिला गंभीर दुखापती झाल्या आणि तिचा मृत्यू झाला. या वेळी फिर्यादी आणि इतरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी मृतदेहाचा तपासणी अहवाल प्राप्त केला असून, अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंपळे, तसेच कासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे व पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT