दुचाकी नाल्यात पडून पित्याचा मृत्यू, मुलगा जखमी
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : जासई येथून सोनारी गाव येथे मुलासोबत मोटारसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री घडली. उरण पोलिसांनी मृत मोटारसायकलचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील मृत मोटारसायकलचालकाचे नाव पवनकुमार भगवानदास गुप्ता (वय ३४) असे असून, जखमी झालेल्या त्याच्या मुलाचे नाव अभिषेक (वय १३) असे आहे. पवनकुमार हा उरणमधील सोनारी गाव येथे कुटुंबासह राहत होता. रविवारी सायंकाळी ते आपल्या मुलासह जासई येथे मोटारसायकलवरून सामान आणण्यासाठी गेले होते. सामान खरेदी केल्यानंतर पवनकुमार हे आपल्या मुलासह सोनारी गाव येथे परतत असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल दास्तान फाटा ते करळ ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आली असताना नियंत्रण सुटून ते मुलासह नाल्यात पडले. अभिषेकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.