रस्त्यावर बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह
पेणमधील घटनेने खळबळ
पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दुरशेत फाट्यालगत असणाऱ्या नदीकडेच्या रस्त्यावर एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती पेण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणला.
मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या दुरशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला गेल्या तीन चार दिवसांपासून एक मोठी बॅग पडलेली ग्रामस्थांना दिसली. त्यादरम्यान गावकऱ्यांची चर्चा सुरू झाली होती; मात्र या बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता बॅगेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर मृतदेह पोलिसांनी अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून, याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुरशेत फाट्याजवळ मागच्या चार-पाच महिन्यांपूर्वी पुरुषाचा मृतदेह आणि त्यानंतर बंदुकीच्या काही गोळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.