मुंबई

मोनोरेल रस्ता होणार चकाचक

CD

मोनोरेल रस्ता होणार चकाचक
मार्गालागतच्या झाडांची छाटणी करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : चेंबूरपासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावणाऱ्या मोनोरेलचा रस्ता आता चकाचक होणार आहे. मोनोरेलचा मार्ग उन्नत असून, त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. त्यामुळे मोनोरेल चालवताना चालकांना काहीसा आडथळा निर्माण होत असून, पिलर आणि चाकांमध्ये झाडांच्या फांद्या येण्याचा प्रकार घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेडने (एमएमओसीएल) मार्गाला लागून असलेली झाडे आणि फांद्या तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोनोच्या मार्गातील झाडांचा आडथळा दूर होणार आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक यादरम्यान एमएमओसीएलकडून मोनोरेल चालवली जात असून, दररोज हजारो प्रवासी याचा लाभ घेतात. दरम्यान, २० किलोमीटर लांबीचा मोनोरेलचा उन्नत मार्ग असून, त्याच्या बाजूने अनेक ठिकाणी झाडे असून, त्याच्या फांद्या मोनोचे पिलर, ट्रॅकच्या पिलरपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे संचलनादरम्यान अडथळा निर्माण होतो. त्याची दखल घेत एमएमओसीएलने झाडांच्या छाटणीसाठी टेंडर काढले असल्याची माहिती मोनोरेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सध्या झाडांमधून लपतछपत धावणाऱ्या मोनोरेलचे सर्वांना दर्शन घडू शकणार आहे.

रात्रीच्या वेळेत होणार छाटणी
सकाळी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत मोनोची सेवा सुरू असते. त्यामुळे मोनोच्या ट्रॅकला लागून असलेल्या झाडांची छाटणी रात्री १२ ते पहाटे चार या वेळेत मोनोसेवा बंद असताना करणे बंधनकारक असल्याचे एमएमओसीएलने स्पष्ट केले आहे. तसेच झाडांच्या छाटणीसाठी आवश्यक असलेल्या मुंबई महापालिका, पोलिस, परिवहन विभाग यांच्या सर्व परवानग्या संबंधित ठेकेदाराने घेणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT