ठाणे पालिका उपायुक्तांसह पोलिसांना धक्काबुक्की
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी परिसरातून बुलेट ट्रेनचा मार्ग जात आहे. या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणावर सोमवारी ठाणे महापालिका आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली. पण कारवाईदरम्यान स्थानिकांनी पालिकेच्या उपायुक्तांसह पोलिसांना धक्काबुक्की केल्याने काही काळासाठी कारवाई थांबवण्याची वेळ पालिकेवर आली.
ठाणे महापालिका क्षेत्नातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी गावातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांशी प्रकल्प असल्याने राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपोर्रेशन लिमिटेडच्या माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या भागात ६० बाय २५ मीटर क्षेत्राचे बांधकाम उभारण्यात आले होते. याठिकाणी तळ अधिक एक मजल्याचे काम सुरू होते. तसेच आणखी एक मजला वाढविण्यात आला होता. तसेच पालिकेने कारवाई करु नये, म्हणून अनेकांना वास्तव्य देखील होते. पण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बांधकामावर कारवाई केली आहे.
--------------------------------
काही काळासाठी तणाव
ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी सपना चौरे, नितीन पिंगळे (तलाठी) आणि मुंब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून सोमवारी या बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करताना उपायुक्त मनीष जोशी आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली होती. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.