‘जीवन प्राधिकरणा’चे जुने रेकॉर्ड जळून खाक
बदलापूर, ता. १० (बातमीदार) ः बदलापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सकाळी अचानक आग लागली होती. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या या आगीत पाणीपुरवठा संदर्भातील सगळे जुने रेकॉर्ड जळून खाक झाल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात आहे. सकाळी पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यासाठी त्यांनी जनरेटर चालू केला; मात्र पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर या ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. महत्त्वाचे म्हणजे, ज्या खोलीत ही आग लागली, त्या खोलीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील जुन्या नोंदी व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी आले. या वेळी ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने येऊन आग विझवली; मात्र काही कागदपत्रे जळून खाक झाली. बहुतांशी नोंदी संगणकीकृत असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.