मुंबई

कंपनीच्या सहकाऱ्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

CD

कंपनीच्या सहकाऱ्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार
अंधेरीतील घटना; सहकारी आरोपीस अटक
अंधेरी, ता. १२ (बातमीदार) ः एका खासगी कंपनीच्या सहकाऱ्यानेच त्याच्या सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्‍याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी आरोपी सहकारी परमजीतसिंग तरलोकचंदसिंग कलसी याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली.
आरोपीला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी ही ३१ वर्षांची असून ती अंधेरी परिसरात राहते. ती एका खासगी कंपनीत कामाला असून, तिथेच परमजीतसिंग हादेखील कामाला आहे. एकाच ठिकाणी कामाला असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. शुक्रवारी (ता. ७) त्याने तिला त्याच्या कारमधून बसवून साकीनाका येथील एका हॉटेलमध्ये आणले. हॉटेलच्या रूममध्ये तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्या मोबाईलवरून जीपेद्वारे ५० हजार रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. तिने चुकीचा पिन क्रमांक दिला म्हणून त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धमकी देऊन तिला घरी पाठवून दिले. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. रविवारी (ता. ९) तिने आरोपी सहकाऱ्याविरुद्ध साकीनाका पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच परमजीतसिंगला त्याच्या जोगेश्वरीतील तिवारी चाळीतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT