वाशी, ता. १२ (वार्ताहर) : कोपरखैरणे येथे एका महिलेने रिक्षात विसरलेली तीन लाखांचे सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केली. यामुळे धावत्या जगात व समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियांका पार्टे या सकाळी गावावरून कोपरखैरणे येथे आल्या होत्या. रिक्षातून घरी जात असताना त्या आपली दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्या. घरी पोहोचल्यावर बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या बॅगमध्ये सुमारे तीन लाखांचे सोन्याचे दागिने होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोपरखैरणे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी रिक्षाचालक अभिषेक बरदाडे याचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात बोलावले. रिक्षाचालकाने बॅगमधील सर्व दागिने सुरक्षितपणे परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी त्याचे कौतुक केले. दागिने परत मिळाल्याने प्रियांका पार्टे यांनी कोपरखैरणे पोलिसांचे आणि रिक्षाचालकाचे आभार मानले. रिक्षाचालक अभिषेक बरदाडेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कोपरखैरणे पोलिसांनी त्याचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.