शहापूर, ता. १२ (बातमीदार): भातखरेदी झालेल्या करोडोच्या अपहाराच्या चौकशीची मागणी करताना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अपर्णा खाडे यांनी केली आहे. याच अनुषंगाने १८ मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक संचालकांना पत्राद्वारे दिला आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीत व बारदानात झालेल्या घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शासनाने आधारभूत किंमत योजना मालाला योग्य वेळेत रास्त भाव मिळावा, बारदान घोटाळा प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करणे, बारदान घोटाळा प्रकरणी अन्य केंद्रात आढळलेल्या तफावतीनुसार गुन्हे दाखल करणे, अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर भात खरेदीच्या पावत्या देऊनही मोबदला मिळाला नसल्याने त्यांना मोबदला देणे, तसेच याप्रकरणी दोषी व्यापारी, शेतकरी, तलाठ्यावर गुन्हे दाखल करणे, अशा मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत. तर याप्रकरणी वरिष्ठ कार्यालयाकडून पाठपुरावा सुरु असल्याचे शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळाचे जी.एम.सावळे यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.