मुंबई

काँक्रिटीकरणाच्या खोदकामात बत्ती गुल

CD

काँक्रीटीकरणाच्या खोदकामात बत्ती गुल
कांदिवली गावठाण मार्गावर अंधार
कांदिवली, ता. १२ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेतील कांदिवली गावठाण मार्गावरील गटाराचे काँक्रीटीकरण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. दरम्‍यान, जेसीबीने चक्क रस्त्यावरील विद्युत खांब आडवे केले. त्‍यामुळे गावठाणातील मुख्य मार्गावरील दिवे बंद झाल्‍याने रात्री अंधारात चाचपडत स्‍थानिकांना घर गाठावे लागत आहे.
कांदिवली पश्चिम स्‍थानकापासून महावीर नगर चारकोप, गोराईकडे जाण्यासाठी कांदिवली गावठाण हा कमी अंतराचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर सतत रहदारी असते. मागील आठवड्यात या मार्गावरील गटाराचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या खोदकामात जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील विजेचे खांब पाडण्यात आले. त्‍यामुळे गेल्‍या सहा दिवसांपासून या मार्गावरून नागरिकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे. अरुंद मार्ग व रहदारी जास्त असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावठाणातील दुसरा मार्ग काँक्रीटीकरणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. पालिकेने अथवा वीज वितरण कंपनीने तात्पुरत्या विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी साई सेवा मंडळाचे अध्यक्ष आशीष पाटील यांनी केली आहे.

भटक्‍या श्‍वानांचा वावर

गावात भटक्या स्वानांचा वावर जास्त आहे. त्‍यामुळे अंधारात पहाटे घराबाहेर पडणाऱ्या तसेच उशिरा कामावरून येणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT