मुंबई

थोडक्‍यात रायगड

CD

शाळा दुरुस्तीकरिता २५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
माणगाव, ता. १२ (बातमीदार) ः छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी व शालेय शौचालयाच्‍या नवीन बांधकाम तसेच शाळा सुशोभीकरणाकरिता कॉमनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने २५ लाख, ४२ हजार निधी देण्यात आला आहे.
माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची इमारत दुरुस्ती करणे आवश्यक होते. तसेच विद्यार्थ्यांना शौचालय सुविधा, पाणी व्यवस्था व सभागृह सजावट तसेच पोषण आहार खोली नूतनीकरण याकरिता निधीची आवश्यकता होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण कृष्णा महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून कॉमनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने त्यांच्या सीएसआर फंडातून हा निधी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सदस्य डॉ. प्रदीप कांगणे, किशोर अल्हाट व सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण कृष्णा महाडिक, कंपनी व्यवस्थापक शेशमानी सिंग, सूमया मुल्ला, कोमल गोसावी, शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम, शिक्षक विनोद लाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धनादेश कंपनीच्या कार्यालयामध्ये सुपूर्द करण्यात आला. कॉमनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील शाळा तसेच सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतो. ग्रामीण भागाची बांधिलकी जपत पायाभूत सुविधा, शिक्षण, सामाजिक व्यवस्था उभी करण्यामध्ये कॉमनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अग्रक्रम देत असते.
.....................
ॲड. गौतमभाई पाटील प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग जवळील खानाव येथील नवतरुण स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावर ॲड. गौतमभाई पाटील (अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ) प्रीमियर लीग लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते २२ मार्च २०२५ या कालावधीत होत असलेली ही स्पर्धा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणार असून, ही स्पर्धा फक्त अलिबाग तालुक्यातील खेळाडुंसाठी मर्यादित आहे. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील निमंत्रित १२ संघांचा सहभाग असून अभिजित तुळपुळे स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यात लेदर बॉल क्रिकेटला चालना मिळावी व तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आहे. या स्पर्धेचे स्वरूप प्रथम लीग व त्यानंतर बाद फेरीनुसार असून स्पर्धा पांढऱ्या चेंडूवर व रंगीत गणवेश परिधान करून आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजयी संघाला रोख ५० हजार व उपविजयी संघाला रोख २५ हजार व आकर्षक चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
..........
आदिवासी वाडीत वाढदिवस साजरा
कर्जत (बातमीदार) ः आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि कातकरी समाजाचे नेते सोमनाथ वाघमारे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी नांगुर्ले येथील आदिवासी वाडीत जाऊन लहान मुलांना खाऊचे वाटप केले. तसेच त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले. वाघमारे हे मुळचे कातकरी समाजातील असून, समाजाच्या गरजा आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याऐवजी आदिवासी बांधवांसोबत वेळ घालवण्याचा त्यांनी संकल्प केला. आदिवासी वस्तीतील मुलांच्या चेहऱ्यावर हसूपाहून वाढदिवस साजरा करतानाचा आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: भंडाऱ्यात दुहेरी अपघात; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT