मुंबई

खर्डीतील साखरगाठींची पंचक्रोशीत चर्चा

CD

नरेश जाधव ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता.१२ ः होळीसाठी साखरेच्या गाठींची मागणी असते. खर्डीत आजही साखरेचे हार,कडे व लाडू बनविण्याचे काम पारंपारिक पद्धतीने केले जाते. विशेष म्हणजे, तीन पिढ्यांचा हा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी राजेंद्र परदेशी यांचा परिवार आजही हाच व्यवसाय करतो.
खर्डी परिसरात आदिवासी बांधव होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. होळीला साखरेचे हार, कडे यांना विशेष मागणी असते. वाढत्या महागाईमुळे बोटावर मोजण्याइतकेच जण हा व्यवसाय करतात. खर्डीत दिवंगत बन्सीलाल परदेशी यांनी छोट्याशा स्वरूपात हा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र आणि जगदीश परदेशी यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. या कामात त्यांची दोन्ही मुलेही त्यांना मदत करतात. त्याचबरोबर जत्रेतील विविध मिठाईंचा व्यवसायही करतात. गुडीपाडव्यापासून अगदी रंगपंचमीपर्यंत परदेशी बंधू दहा ते पंधरा दिवस आधीपासून उत्पादनासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. त्यांच्या साखरेच्या गाठींना शहापूर, कसारा, घोटी, अजनुप, आटगावातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते.
-------------------------------------
चेहऱ्यांवरील आनंदाचे समाधान
साखरगाठी बनवण्याचा हा व्यवसाय परवड नाही. कामासाठी मजूरही मिळत नाही. साखरेची भाववाढ तसेच रोजची मजुरी ५०० रुपयांवर गेल्याने सद्या ४ हजार किलोचा माल बनवतो. साखर, खाण्याचा रंग, इंधन, पाणी, मजूर, लाकडी साचे, दोरा, पुठ्याचे खोके यासाठी येणारा किलोचा खर्च ९० ते १०० रूपयांचा असतो. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांना १३०/१६० रूपये तर घाऊकमध्ये १२० रूपये किलोप्रमाणे माल विकावा लागतो. त्यामुळे हा व्यवसाय जिकिरीचा झाला आहे, पण आदिवासी कुटुंबातील लहान मुलांच्या चेहऱ्यांवरील आनंदाचे समाधान असल्याचे राजेंद्र परदेशी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT