मुंबई

शेतकऱ्याच्या जमिनीवर ताब्याचा प्रयत्न

CD

शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न
टिटवाळा, ता. १२ (वार्ताहर) : एका शेतकऱ्याच्या जमिनीवर गैरसमजातून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नाकर धर्मा पाटील यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर २२३/२ स आणि २२३/२ फ या मिळकतीवर कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीच्या वतीने फलक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र पाटील यांनी वेळीच याला आक्षेप घेतला आणि अधिकृत कागदपत्रांची मागणी केली. पतपेढीच्या कर्मचाऱ्यांकडे योग्य ती कागदपत्रे नसल्याने त्यांनी जागेवरचा ताबा सोडला. पाटील यांनी यासंदर्भात कायदेशीर कारवाईचा विचार केला आहे.
पतपेढीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले, की एका कर्जदाराच्या थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई करण्यात येत होती; मात्र संबंधित व्यक्तीने चुकीची जागा दाखवली. त्यामुळे गैरसमजातून पाटील यांच्या मालमत्तेवर कारवाई सुरू झाली. पाटील यांनी याला आक्षेप घेतल्यानंतर ही चूक लक्षात आली. दोन्ही पक्षांमध्ये यावर चर्चा झाली.
शेतकरी रत्नाकर पाटील यांनी सांगितले, की हा प्रकार गैरसमजातून घडला असला तरी त्यांच्या जमिनीवर चुकीची कारवाई होत असल्याचे पाहून त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला. त्यांनी पतपेढीला कायदेशीर नोटीस पाठवली असून पुढील कारवाईबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, पतपेढीनेदेखील प्रकरण मिटल्याचे सांगत अशी चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT