शोभायात्रेची विठ्ठलवाडीत जोरदार पूर्वतयारी
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्वागतयात्रा निघत असतात. विठ्ठलवाडी- खडेगोवलीतदेखील हिंदू सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून प्रतिवर्षी स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाही त्याचे आयोजन मोठ्या जल्लोष आणि थाटामाटात करण्यात येणार आहे. नुकताच हिंदू सांस्कृतिक मंचने सार्वजनिक पूर्वतयारी सभा आयोजित केली होती. या बैठकीला विठ्ठलवाडी व खडेगोवलीतील मंडळाचे पदाधिकारी, विविध संस्था आणि मंडळाचे प्रमुख तसेच नागरिक उपस्थित होते.
काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तयारी केली आहे. अनेकांनी आपले बहुमोल विचार या बैठकीमध्ये मांडले. यावर्षी गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रेत लेझीम पथक, पुणेरी ढोल, आदिवासी लोकनृत्य, राधामाधव मंदिर पथक, ब्रह्मकुमारी आश्रम सामाजिक देखावे, झारखंड मंडळाचे विविध पथक, गायत्री परिवाराची कलशयात्रा, वैदुवाडी युवकांचे साहसी खेळ प्रात्यक्षिके, बाळ गोविंदा पथकांचे मनोरे हे आकर्षण असणार आहे, असे हिंदू सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष मनोज माळी यांनी सांगितले.
पूर्वतयारी सभा नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात या आयोजन केली होते. विविध संप्रदाय आणि समाजाचे लोक या शोभायात्रेत सहभागी होतात. यावेळी मंचाचे संस्थापक किशोर आल्हाट, माजी अध्यक्ष उदय म्हात्रे व शांताराम बोरसे तसेच विद्याधर आल्हाट, अरुण जुईकर, शैलेश मुसळे हे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.