पनवेल, ता. १२ (वार्ताहर) : पनवेल येथून रक्ताचे नमुने घेऊन उलवे येथे जाणारा तरुण दुचाकीवरील ताबा सुटल्याने खड्ड्यामध्ये पडला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) पहाटे नवी मुंबई विमानतळाजवळ घडली. या अपघाताला दुचाकी चालवणारा तरुण स्वतः जबाबदार असल्याचे आढळून आले. त्यानुसार उलवे पोलिसांनी मृत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत वीरपाल नारायण गिरासे (२१) हा तरुण जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील असून, सध्या तो पनवेलमधील नातेवाइकाकडे राहत होता. तो उलवेतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये काम करीत होता. सोमवारी रात्री वीरपाल आपल्या दुचाकीवरून हॉस्पिटलमधील रक्ताचे नमुने घेऊन पनवेल येथे गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तो पनवेल येथून रक्ताचे नमुने घेऊन उलवे येथील हॉस्पिटलमध्ये परतत होता. दरम्यान, तो पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास वाघीवली गाव ते अंबुजा सिमेंट कंपनीकडे जाणारे रोडवरून भरधाव जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून तो खड्ड्यामध्ये पडून गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या अपघातात वीरपाल याच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उलवे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.