रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त
अलिबाग ता. १२ (वार्ताहर) : होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन त्याचप्रमाणे सलग सुट्टीमुळे अलिबागमध्ये पर्यटकांचीही गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिस विभागाने सर्वत्र बंदोबस्त ठेवला आहे.
कोळी बांधवांतर्फेही होळी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अलिबाग समुद्रकिनारी धुलिवंदननिमित्त बैलगाडी शर्यतींची परंपरा आहे. ग्रामीण भागात होळीची परंपरा जपण्याचे विशेष प्रयत्न होताना दिसतात. केळी, सावरी, पोफळीचे झाड होळीसाठी वापरले जाते.
जिल्ह्यात गुरुवारी दोन हजार ८९८ सार्वजनिक आणि एक हजार ११४ खासगी अशा एकूण चार हजार १२ होळ्या उभारल्या जाणार आहेत. धुळवडनिमित्त बाजारपेठेमध्ये वेगवेगळे रंग, पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. होळी पौर्णिमा, धूलिवंदन या सुट्यांमुळे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात. होलिकोत्सव आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस विभागाने वडखळ, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन येथे आरसीपीची पथके तैनात केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.