मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

CD

हार्बर, मध्य रेल्वेवर
उद्या मेगाब्लॉक

प्रवाशांचे होणार हाल; रूळ, सिग्नल दुरुस्तीची कामे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १६) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कामे करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नाही.
------------
मध्य रेल्वे

कुठे : ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर  
कधी : सकाळी १०.४०  ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद-अर्ध जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून त्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद-अर्ध जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. आपल्या गंतव्यस्थानी त्या १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
---------------
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५  ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-ठाणे अप-डाऊन मार्गावरील सेवाही बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल उपलब्ध असतील. याशिवाय बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान सेवा सुरू राहणार आहे.    
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT