मुंबई

१३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी गजाआड

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : रबाळे परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले.

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सुन्या उर्फ सुनील रमेश रत्नाकर (वय २३) या आरोपीविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून
त्याला अटक केली आहे. आरोपी सुन्या उर्फ सुनील रत्नाकर व पीडित मुलगी हे दोघेही सध्या शिक्षण घेत आहेत. आरोपीने वर्षभरापूर्वी पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडितेला डिसेंबरमध्ये तळोजा येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतरदेखील आरोपीने पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिल्याने तिच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला घणसोलीतील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेल्यांनतर पीडित मुलगी १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पीडिता अल्पवयीन असल्याने हॉस्पिटलने याबाबतची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडिताच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT