मुलीला २९व्या मजल्यावरून फेकून आईची आत्महत्या
पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : एका ३७ वर्षीय महिलेने आपल्या आठवर्षीय मुलीला २९व्या मजल्यावरून खाली फेकून स्वत:देखील उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पनवेलमधील पळस्पे येथील मॅरेथॉन नेक्सॉन गृहनिर्माण संकुलातील ऑरा इमारतीत बुधवारी (ता. १२) सकाळी घडली.
मृत महिलेने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी कौटुंबिक कारणावरून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पनवेल शहर पोलिसांडुन या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेतील मृत मुलीचे नाव मायरा असे असून आईचे नाव मैथिली आशीष दुआ (वय ३५) असे आहे. मैथिली ही पती आशीष (वय ४१) व मुलगी मायरा यांच्यासोबत राहत होती. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आशीष हा बेडरूममधील बाथरूममध्ये जात असताना मैथिलीने त्याला बेडरूमच्या बाहेर ढकलून दिले व दरवाजा आतून लावून घेतला. त्यावेळी त्यांची मुलगी मायरा मदतीसाठी आरडाओरड करीत होती. यावेळी आशीष दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असतानाच मैथिलीने मुलगी मायरा हिला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यानंतर तिनेदेखील त्याच ठिकाणावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय
मैथिली हिने आपल्या आठवर्षीय मुलीला खाली फेकून दिल्याने तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मैथिली हिच्यावर मानसिक उपचार सुरू होते; मात्र काही दिवसांपासून ती नियमित औषधे घेत नव्हती. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तिने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.