महिन्याभरात महाराष्ट्र दंगलींनी पेटेल : आव्हाड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : महाराष्ट्र हा येत्या महिन्याभरात दंगलींनी पेटलेला असेल, याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाचे काही निवडक नेतेमंडळी असतील, असा हल्लाबोल करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ठाणे महापालिकेतील अधिकारीच अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा गौप्यस्फोट करीत अशा अधिकाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा त्या अधिकाऱ्याचे आपणच नाव फोडणार आणि त्याने केलेले कृत्य जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार आव्हाड हे गुरुवारी (ता. १३) ठाणे महापालिकेत आयुक्त सौरभ राव यांना भेटण्यासाठी आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई करा, असा कायदा असताना, पालिकेतील अधिकारीच अनधिकृत बांधकाम करीत आहेत. मुंब्र्यात अशाच अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता करता येत नाही. या बांधकामांच्या वसुलीसाठी गॅंगवॉर होणार असेल, तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, की आयुक्त महोदय हे आपण सहन करू नका. शेवटी डाग हा तुमच्या अंगावरच लागणार आहे. हे अधिकारी खोटे कागदपत्रे तसेच दाखले तयार करीत असतात. तसेच त्याच्यावर स्वाक्षरी तुमची घेतात. त्यामुळे कधीतरी तुम्ही फसाल.’ महापालिकेकडे वर्ग होऊन आलेले अधिकारी हे अत्यंत भ्रष्ट असल्याचा आरोपही या वेळी आव्हाड यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.