मुंबई

थोडक्‍यात रायगड

CD

जल फाउंडेशन कोकण विभागच्या वतीने पाण्याची टाकी भेट
पोलादपूर (बातमीदार) ः पोलादपूर व खेड तालुक्यातील अनुक्रमे पळचिळ सातपानेवाडी आणि खेड तालुक्यातील दहिवली राजवाडी गावाला जल फाउंडेशन कोकण विभागच्या वतीने पाच हजार लिटर पाण्याची टाकी व पाइप भेट देण्यात आले. या टाकीमुळे गावासाठी पाणी साठवणूक करण्याची अडचण दूर झाल्याने दिलासा मिळाला आहे. जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये मागील सहा वर्षापासून पाण्यासाठी छोटी-मोठी कामे केली जात आहेत. यातूनच ग्रामीण भागातील छोट्या वाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पोलादपूर तालुक्यातील पळचिळ सातपानेवाडी आणि खेड तालुक्यातील दहिवली राजवाडी या दोन वाड्यांचे काम करण्यात आले आहे. पळचील सातपाणेवाडी या ठिकाणी पाच हजार लिटरची टाकी तसेच दहिवली राजवाडी या ठिकाणी पाचशे मीटर एचडीपीसी पाइप खरेदी करण्यात आली असून, १२ मार्च रोजी हे साहित्य ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आले. जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांनी हातभार लावल्याने पाणीटंचाईचे सावट दूर करता येईल, असा विश्वास नितीन सखाराम जाधव (संस्थापक अध्यक्ष, जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर) यांनी व्यक्त केला आहे.
............
खानाव येथे टी-२० क्रिकेट प्रीमियर लीग सुरुवात
पोयनाड, (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील खानाव येथील नवतरुण स्पोर्टस क्लबच्या क्रीडांगणावर ॲड. गौतमभाई पाटील (अध्यक्ष जनता शिक्षण मंडळ) टी-२० लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा शुभारंभ रविवार १६ मार्च रोजी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, खानावचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवतरुण स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष जितेंद्र गोंधळी, आरडीसीएचे सहसचिव जयंत नाईक, राजेंद्र ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सध्या अलिबाग तालुक्यात टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वत्र धुमाकूळ सुरू असताना, लेदर बॉल क्रिकेटला चालना मिळावी व तालुक्यातील क्रिकेटपटूंना चांगले व्यासपीठ मिळावे या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील निमंत्रित १२ संघांचा सहभाग आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना अभी ११ अलिबाग विरुद्ध मेडिकल कॉलेज अलिबाग या दोन संघांमध्ये खेळला गेला. त्यामध्ये अभी ११ अलिबाग मेडिकल कॉलेज अलिबाग संघाचा ९६ धावांनी पराभव केला असून, अष्टपैलू खेळाडू सचिन घरत याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी ॲड. गौतम पाटील यांचे अलिबाग तालुक्यात लेदर बॉल क्रिकेटला नवसंजीवनी दिल्याबद्दल आभार मानले व त्यांनी भविष्यात आरडीसीएसाठी योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.
..........
धामणपाडा येथील क्रिकेट स्पर्धेत चौकीचापाडा संघ अंतिम विजेता
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील धामणपाडा येथे रविवार १६ मार्च रोजी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये जय हनुमान चौकीचापाडा या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. धामणपाडा गावातील जय हनुमान धामणपाडा क्रिकेट संघाच्या वतीने पांडवादेवी येथील मैदानावर असोसिएशनच्या मान्यतेने हे सामने खेळवण्यात आले. या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक जय हनुमान चौकीचापाडा, द्वितीय क्रमांक यंग बॉइज घसवड, तृतीय क्रमांक मरी आई लेभी, चतुर्थ क्रमांक जय बजरंग घसवड या संघाने पटकावला. या संघांना पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज निर्भय जुईकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आदेश पाटील आणि मालिकावीर सनील पाटील यांना हे किताब देऊन गौरविण्यात आले. या सामन्यांचे उद्‌घाटन राजिपचे माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील, शहाबाजचे उपसरपंच भूपेंद्र पाटील, अर्जुन शेळके यांच्या हस्ते करण्यात आले, तर समारोप ॲड. उमेश ठाकूर, विद्याधर पाटील, प्रवीण म्हात्रे, कैलास म्हात्रे, अजय पाटील, सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सामने पाहण्यासाठी शहाबाज पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी रसिकांनी गर्दी केली होती.
.............
दहावीच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष
कर्जत (बातमीदार) ः नुकतेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बोर्ड परीक्षांचे सर्व पेपर संपल्याने कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला. परीक्षेच्या तणावातून मुक्त होताच विद्यार्थ्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन भावना व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून या क्षणांच्या खास आठवणी म्हणून संग्रहीत केले. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी प्रेरणा दिली. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या आठवणींना उजाळा देत, आता सुट्टीचा आनंद घेण्याच्या योजना आखल्या. काही जण सहलींना जाण्याचा विचार करत होते, तर काहींनी वेगवेगळ्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी सुरू केली आहे.
...........
माणगाव येथील निर्मला शेट यांचे निधन
माणगाव (बातमीदार) ः येथील रहिवासी निर्मला शेट यांचे शनिवार १५ मार्च रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी माणगाव येथे निधन झाले. येथील प्रतिष्ठित व्यापारी कृष्णकांत गणपत शेट (भाई) यांच्या
त्‍या मातोश्री होत. मृत्युसमई त्यांचे वय ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने समस्त शेट परिवारावर शोककला पसरली आहे. निर्मला गणपत शेट या शांत व संयमी स्वभावाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची वयोमानानुसार प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाची माहिती माणगावात समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. निर्मला गणपत शेट यांच्यावर माणगाव येथील स्मशानभूमीत त्याच दिवशी रात्री ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. निर्मला गणपत शेट यांचा दशक्रिया विधी सोमवार २४ मार्च रोजी, तर उत्तरकार्य विधी गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी राहत्या घरी मोर्बा रोड माणगाव स्टेट बँकेच्या शेजारी येथे होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र कृष्णकांत शेट (भाई) यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार

Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

SCROLL FOR NEXT