`सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ गुरुवारी रंगणार
अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार
मुंबई, ता. १७ : मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवारी (ता. २७) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे.
सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कविसंमेलन, एकांकिका आणि ‘आणखी एक मोहन्जोदारो’ या बहुचर्चित लघुपटाचे प्रदर्शन असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संमेलनास सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनचे अजय कांडर यांनी केले आहे.
-----------------
मास्तरांची सावली पुरस्कार
या संमेलनात प्रदीप आवटे, योगिता राजकर, सुनील उबाळे, सफर अली इसफ, मधुकर मातोंडकर आणि सुजाता राऊत या साहित्यव्रतींचा ‘मास्तरांची सावली’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.