मुंबई

मासळी मार्केटचे काम प्रगतिपथावर

CD

अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) ः शहरातील पीएनपीनगर येथे सुरू असलेल्‍या मासळी मार्केटचे काम काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडलेले होते, मात्र आता कामाला गती आली असून, दुमजली इमारत लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोळी महिलांना आपला मासळी विकण्यासाठी हक्काची व स्वच्छ जागा उपलब्ध होणार आहे.
शहरातील पीएनपीनगर येथील मासळी मार्केटची इमारती जुनी व मोडकळीस आली होती. या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने कोळी महिलांना रस्त्याच्या कडेला बसून मासळीविक्री करावी लागायची. त्यामुळे परिसरात गर्दी व अस्वच्छता पसरते. आता नवीन दुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीत जास्तीत जास्त विक्रेत्‍यांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी, वाहतूक कोंडी कमी होईल. इमारतीचे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते, मात्र त्यानंतर पावसाळा आणि निवडणूक आचारसंहित, तर काही मासळीविक्रेत्‍यांनी केलेल्‍या विरोधामुळे इमारतीचे काम रखडले होते. आता स्थानिकांचा विरोध मावळल्यानंतर इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, जूनअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विविध सोयीसुविधा
मासळी मार्केटच्या नवीन इमारतीमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मासळीविक्री करणाऱ्या महिलांसह खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांसाठी स्‍वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. तसेच ड्रेनेजची व्यवस्‍था असेल. त्‍यामुळे मासळी धुतल्यानंतर ते पाणी रस्त्यावर टाकण्याची वेळ येणार नाही. परिणाम परिसरातील अस्वच्छता कमी होण्यास मदत होईल.

कचऱ्यासाठी ओडब्ल्यूसी मशीन
मच्छी मार्केटमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. यासाठी ओडब्ल्यूसी (ऑरगॅनिक वेस्ट) मशीन घेण्यात येणार आहे. यामुळे हा कचरा टाकण्याचा अथवा त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

मासळी मार्केटचे काम काही कारणांमुळे रखडले होते. आता मेअखेर अथवा जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून विक्रेत्यांना त्रास होणार नाही. या ठिकाणी उभारण्यात येणारी इमारत सर्वसमावेशक असून, सर्व विक्रेत्‍यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनाही त्रास होणार नाही.
- सचिन बच्छाव, प्रशासक तथा मुख्याधिकारी, अलिबाग

मासळी मार्केट इमारतीचे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. काही कारणांमुळे काम रखडले. दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जूनअखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
-संतोष मुंढे, नगर अभियंता, अलिबाग नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT