मुंबई

गुंदलेत ‘करमतारा’ नकोच

CD

गुंदलेत ‘करमतारा’ नकोच
ग्रामस्थांचा तीव्र विरोध; कंपनीविरोधात ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव

गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील कंपनी सुरू करण्याला स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध, ग्रामस्थ आक्रमक
धोकादायक लोखंड प्रक्रिया कारखाना गावात न व्हावा ग्रामपंचायतमध्ये ठराव पारित
सूर्या नदीकाठी प्रदूषण आरोग्यास धोकादायक

बातमीदार : सुमित पाटील बोईसर
बोईसर ता. १८ (बातमीदार) : बोईसर पूर्वेकडील गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील कंपनी सुरू होण्याला स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला आहे, कारण त्यांना या कंपनीमुळे त्यांच्या पर्यावरणावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गुंदले गावाच्या हद्दीतील लोकवस्तीलगत करमतारा इंजिनिअरिंग पीव्हीटी एलटीडी प्रोफाईल बिझनेस कंपनी लोखंडावर प्रक्रिया करणार आहे. यासाठी कंपनीकडून बांधकाम परवानगी व ना हरकत दाखल्यासाठी मागणी करण्यात आली आहे, मात्र या कंपनीला गुंदले ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत (ता. ११) पंचायत समिती कार्यालय पालघर गटविकास अधिकारी यांच्याकडेही पत्रव्यवहाराद्वारे निवेदन देऊन चर्चा केली. यासाठी बुधवारी (ता. १२) गुंदले ग्रामपंचायत कार्यलयात ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. या वेळी एकच जिद्द, करमतारा रद्द, अशा घोषणाही देण्यात आल्या.
------------------------------------
म्हणून कंपनीला विरोध
करमतारा कंपनीला विरोध केला जात आहे, कारण करमतरा कंपनी ही प्रदूषण करणारी आहे. त्यामुळे गुंदले गावामध्ये जलस वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार आहे. लोखंडावर प्रक्रिया करण्यासाठी भट्ट्या बॉयलर्स येणार असून, यामुळे तापमानातही फरक पडणार आहे. तसेच कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळेही नद्यांचे पाणी दूषित होणार आहे.
---------------------------------
ग्रामस्थांचे म्हणणे काय आहे?:
कंपनीकडून भविष्यात गुंदले ग्रामपंचायत गावातील विहिरी, बोरिंगचे पाणी फळझाड शेती नुकसानकारक तसेच आरोग्याला धोकादायक वातावरण एकंदरीत ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण होईल, असा आरोप करत ग्रामस्थांनकडून कडाडून विरोध दर्शविला जात आहे.
--------------------------------
राजकीय वापर
ही कंपनी येण्यासाठी स्वार्थी दलाल पैशाच्या जोरावर राजकीय ताकद वापरून कंपनी व्हावी, असा घाट धरत आहेत, परंतु कंपनी होऊ देणार नाही, असा ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव पारित केला आहे.
---------------------------------
प्रतिक्रिया - १)
करमतारा कंपनी गावात आल्यास जलप्रदूषण, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा व निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
- रोहन पाटील - गुंदले ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------
प्रतिक्रिया २)
आम्हा सर्व ग्रामस्थांचा या कंपनीला विरोध असून, ग्रामपंचायतने कुठलाही ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही व भविष्यातही या कंपनीला ग्रामपंचायतचा विरोधच असेल.
नीलिमा पाटील - उपसरपंच गुंदले
-------------------------------
प्रतिक्रिया ३)
गटविकास अधिकारी पंचायत समिती पालघर यांच्यासोबत बोलणे झाले असून, सदर कंपनीला ग्रामस्थांचा असलेला विरोध त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे.
- तृप्ती योगेश पाटील , मा. सदस्या पंचायत समिती, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT