ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार)ः न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा झटपट निपटारा व्हावा तसेच पक्षकारांना वेळेत विना खर्च न्याय मिळावा, याकरिता ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये वर्षांतून चारवेळा राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे. या अदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित आणि दाखल पूर्ण प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जाणार आहेत.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे. यावेळी फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन, विद्युत आणि पाणी देयके, सेवाविषयक पगार, भत्ते व सेवा निवृत्तीचे फायदे विषयक, महसूल, इतर दिवाणी, वहिवाटीचे हक्क, विशिष्ट पूर्व बंद कराराची पूर्तता विषयक वाद आधी प्रलंबित प्रकरणे ठेवता येणार आहेत. त्यासोबतच धनादेश अनादर, बँकेचे कर्ज वसुली, कामगारांचे वाद, कर वसुली, विद्युत आणि पाणी देयक आणि तडजोडमात्र वैवाहिक व इतर दिवाणी ही दाखल पूर्व प्रकरणे निकालासाठी ठेवता येणार आहेत. त्यामुळे पक्षकारांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
--------------------------------------------------
वर्षभरात विक्रमीप्रकरणे निकालात
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विक्रमी प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १,१३,३५० न्यायालयीन प्रलंबित आणि ६८,५३३ दावा दाखल पूर्वप्रकरणी तडजोडीतून निकाली काढण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.